Pune Crime : कोंढवा प्रकरणी तिघा आरोपींना 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी
Continues below advertisement
पुण्यातील कोंढवा (Kondhwa) येथे झालेल्या गणेश काळे (Ganesh Kale) हत्या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. 'आरोपींना ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.' या प्रकरणी अमन शेख (Aman Shaikh), अरबाज पटेल (Arbaz Patel) आणि मयूर वाघमारे (Mayur Waghmare) यांना अटक करण्यात आली आहे. गणेश काळे यांची शनिवारी भरदिवसा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही हत्या टोळीयुद्धाचा बदला घेण्यासाठी झाल्याचा पोलिसांना संशय आहे. मयत गणेश काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा भाऊ आहे. त्यामुळे या हत्येमागे आंदेकर आणि कोमकर टोळ्यांमधील जुने वैर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पोलीस त्या दिशेने अधिक तपास करत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement