Gokhale Property Row: 'विश्वस्त पैसे परत देणार नाहीत', Vishal Gokhale चे २३० कोटी बुडणार?
Continues below advertisement
पुण्यातील जैन बोर्डिंगच्या (Jain Boarding) वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी आज मुंबईत धर्मदाय आयुक्तांपुढे सुनावणी होणार आहे. बिल्डर विशाल गोखले (Vishal Gokhale) यांनी या व्यवहारातून माघार घेतली असून, गुंतवलेले २३० कोटी रुपये परत मागितले आहेत. 'व्यवहार रद्द झाल्यास विश्वस्त पैसे परत देण्यास बांधील असणार नाहीत,' असा करारनामा झाल्याने या पैशांचे भवितव्य आजच्या सुनावणीवर अवलंबून आहे. ८ ऑक्टोबर रोजी झालेल्या या व्यवहारात, जमिनीचे बाजारमूल्य ३११ कोटी रुपये असताना केवळ २३० कोटी रुपयांमध्ये खरेदीखत झाल्याने वाद निर्माण झाला होता. यानंतर, २० ऑक्टोबर रोजी धर्मदाय आयुक्तांनी या प्रकरणावर 'जैसे थे' (status quo) परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. गोखले यांनी २७ ऑक्टोबरला ईमेलद्वारे या व्यवहारातून माघार घेत असल्याची माहिती दिल्यानंतर, सर्वांचे लक्ष आजच्या सुनावणीकडे लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement