Pune Jain Dispute: जैन बोर्डिंग वाद पेटला, खासदार मोहोळ अखेर मैदानात

Continues below advertisement
पुण्यातील जैन बोर्डिंग (Jain Boarding) वादाच्या पार्श्वभूमीवर खासदार मुरलीधर मोहोळ (MP Muralidhar Mohol) यांनी आंदोलक जैन गुरुदेवांची भेट घेतली. 'आप पुणे के जनप्रतिनिधी आहो, पुणे चे आप राजा हो, हमारे जैन समाज को आपकी सहायता चाहिए,' असे भावनिक आवाहन जैन गुरुदेवांनी केल्यानंतर मोहोळ यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी मोहोळ यांनी या प्रकरणात आपला कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट केले आणि राजकीय विरोधक स्वतःची पोळी भाजण्यासाठी गैरफायदा घेत असल्याचा आरोप केला. जैन समाजाच्या भावना लक्षात घेऊन हा व्यवहार रद्द करण्यासाठी आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मी तुमच्यासोबत प्रामाणिकपणे उभा राहीन, असे आश्वासन मोहोळ यांनी दिले. या प्रकरणी पूर्वी राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी शंका उपस्थित केली होती, मात्र कागदपत्रे पाहिल्यानंतर जैन समाजाचा गैरसमज दूर झाल्याचे मोहोळ म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola