Pune Crime : कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या,पुण्यात कौर्याची परिसीमा,खून केल्यावर व्हिडीओ चित्रीत
Pune Crime : कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या,पुण्यात कौर्याची परिसीमा,खून केल्यावर व्हिडीओ चित्रीत
पुण्यात (Pune) एक धक्कादायक घटना घडली आहे. शिलाई मशीनच्या कात्रीने पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा खून केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर पती स्वत: पोलिस ठाण्यात जाऊन हजर झाला आहे. बुधवारी पहाटे खराडीतील तुशजाभवानी नगर परिसरात ही घटना घडली आहे. ज्योती गिते असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. तर शिवदास गिते असं आरोपी पतीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शिवदास गितेला अटक केली आहे. शिवदास गिते हा मूळचा बीडचा असून, न्यायालयात टंकलेखक आहे. खडकी भागात तो भाडेतत्वावर खोली घेऊन राहत होता. काही दिवसांपासूनम हा दाम्पत्यात कौटुंबिक कारणावरुन वाद सुरु होता. बुधवारी पहाटे देखील या दोघांमध्ये वाद झाला. यावेळी पती शिवदास गिती याने शिलाई मशीनच्या कात्रीने पत्नी ज्योती गिते यांच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे. तिने आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांना धाव घेतली. त्यानंतर खराडी पोलिसांनी ज्योती गिते यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. परंतू उपचारापूर्वीच ज्योती गिते यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, या घटनेचा अधिकचा तपास सुरु आहे.
आरोपीने व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हणत आहे?
दरम्यान, आरोपी पतीन शिवदास गिते याने या प्रकरणी माहिती देणारा व्हिडीओ देखील शूट केला आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, मला मारायचा प्रयत्न केला हे मला उशिरा कळलं. मला माझ्या संरक्षणासाठी हा सगळा प्रकार करावा लागला. माझी इच्छा नव्हती तिला माराव किंवा काही करावं. माझ्या घराची लक्ष्मी होती. या मुलीने माझ्या मुलाला जन्म दिला. तिचे सगळे भाऊ वाढीव आहेत. तिच्या भावाने मला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला माराव लागलं. मला या महिलेने मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता. या महिलेने तिची माणसं पुण्यात पेरलेली आहेत.