ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 23 January 2025

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 23 January 2025

महाराष्ट्रात पुन्हा ऑपरेशन धनुष्यबाणाची चाचपणी.. ठाकरे गटाच्या खासदारावर शिंदेंच्या शिवसेनेची नजर, अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात होणार मिशनचं प्लॅनिंग!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज दोन शिवसेनांचे दोन मेळावे, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली अंधेरीत महामेळावा, तर बीकेसीत शिंदेंच्या शिवसेनेचा विजयोत्सव

जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा आकडा १३, नऊ जणांची ओळख पटली.. मृतांमध्ये दहा वर्षाच्या बालकाचा समावेश..अपघातात २५ प्रवासी गंभीर जखमी, रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांमार्फत होणार चौकशी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या दौऱ्यावर, आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसैनिकांशी साधणार संवाद

राज्यात गुंतवणूक आणणाऱ्या तब्बल सोळा लाख कोटींच्या पन्नासपेक्षा जास्त सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या.. दाओस व्यापार परिषद आटोपून उद्योग मंत्री आज मुंबईत परतणार, विमानतळावर स्वागताची जय्यत तयारी

शेतावर जायचंय हेलिकॉप्टर द्या, गोसीखुर्द बॅकवॉटरच्या पाण्यामुळं बाधित झालेल्या ३१ शेतकऱ्यांची सरकारकडं मागणी, सरकार म्हणतं तुमच्या जमिनी पाण्यात नाहीत, तर मोबदला कसला?

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram