Pune Gold Robbery : कोयत्याचा धाक दाखवून 73 हजारांचे दागिने लंपास, पुण्यात चोरीच्या घटना वाढल्या
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे शहरांमध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत .एक धक्कादायक चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोरट्यांना पुणे पोलिसांचा धाकच राहिला नाही. हातात कोयते घेऊन रस्त्यावर नागरिकांमध्ये दहशत पसरवणारे पुण्यात सक्रिय झालेत.लोहगावात सराफ व्यवसायकाला गळ्याला कोयता लावून लुटलय. व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून 73 हजारांचे दागिने चोरट्यांनी लांबवला ही घटना लोहगाव परिसरात घडली व्यवसायिकांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. आझाद चौकात महाले ज्वेलर्स सराफ मध्ये दोन चोरटे दुकानात शिरले त्यांनी दागिने खरेदी करण्याचा बहाना केला. एकाने सराफ व्यवसायकला कोयत्याचा धाक दाखवला तर दुसऱ्या चोरट्यांनी पकडून ठेवलं जीवे मारण्याची धमकी देऊन 73 हजाराचे दोन सोनसाखळ्या लांबल्या याबाबत पोलीस तपास करत आहेत. पुणे शहरामध्ये कोयता गॅंग मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात मात्र पोलिसांचा वचक राहिलेले दिसत नाही.