Satara Girl fall News : Borne Ghat selfie: ट्रेकर्सला घट्ट बिलगली, दोरीला धरुन वर आली..
Satara Girl fall News : Borne Ghat selfie: ट्रेकर्सला घट्ट बिलगली, दोरीला धरुन वर आली..
दरीत कोसळलेल्या या तरुणीचं नावय नसरीन कुरेशी. नसरीन 29 वर्षांची असून ती पुण्यातील रहिवासी आहे. 03 ऑगस्ट रोजी पावसाचा आनंद घेण्यासाठी नसरीन आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत ठोसेघर धबधब्यावर फिरायला गेली होती. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने साताऱ्यातील ठोसेघर धबधबा बंद असल्यानं नसरीन आणि तिच्या ग्रुपने मागे परतण्याचा निर्णय घेतला. परतीच्या प्रवासादरम्यान त्यांनी बोरणे घाटात गाडी थांबवली. सगळेजण पावसाचा आनंद घेत फोटो काढू लागले. हरवागार निसर्ग पाहून नसरीनलाही सेल्फी घेण्याचा मोह आवरला आहे. नसरीन सेल्फी फोटो काढत होती. मात्र तेवढ्यात निसरड्या काठावरुन अचानक नसरीनचा पाय घसरला. नसरीन 100 फूट दरीत कोसळली... काळ आलेला पण वेळ आली नव्हती असंच म्हणावं लागेल..कारण खोल दरीत कोसळून नसरीन थोडक्यात बचावली. एका झाडाचा आधार घेऊन ती कशी बशी जीव मुठीत धरुन होती. नसरीनच्या मित्रांना स्थानिक पोलिसांनी घटनेबाबत कळवलं. पोलिसांनी तात्काळ बचावकार्यासाठी होमगार्ड आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या टीमला माहिती दिली.