Pune Gangster Party | पुण्यात भाईलोकांची डीजे पार्टी, मकोका गुन्हेगारही हजर!
पुण्यातील विमान नगरमध्ये एका पबच्या पार्किंगमध्ये भाईलोकांच्या डीजे पार्टीचा अजब प्रकार समोर आला आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार फिरोझ शेखने या पार्टीचं आयोजन केलं होतं. या वाढदिवसाच्या पार्टीत जोरजोरात डीजे वाजवून गोंधळ घालण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, या पार्टीत मकोकातील गुन्हेगार आकाश कणचिले हा त्याच्या टोळीसोबत उपस्थित होता. ही पार्टी टोळीचा म्होरक्या निखिल कांबळे याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती या पार्टीत पाहायला मिळाली. या घटनेमुळे विमान नगर परिसरात सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. गुन्हेगारांच्या अशा सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्याने आणि गोंधळ घालण्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.