Yavat Violence Update : यवतमधील जमाबबंदी आजपासून शिथील, दोन गटांनी केली होता हिंसाचार
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात तीन दिवसांनंतर जमावबंदी शिथिल करण्यात आली आहे. यवतमध्ये शुक्रवारी एका वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टवरून मोठा राडा झाला होता. या घटनेनंतर शहरात दोन गट आमनेसामने आले होते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने जमावबंदी लागू केली होती. आता, पुढील आदेश येईपर्यंत दररोज सकाळी सहा ते सकाळी अकरा वाजेपर्यंत जमावबंदी शिथिल करण्यात आली आहे. या वेळेत दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. एक ऑगस्ट रोजी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती. तसेच, दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्या सतरा जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. पोलिसांनी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली असून, जमावबंदी शिथिल केल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.