Pune Rave Party | प्रांजल खेवलकर आणि इतरांनी शुक्रवारीही पार्टी केल्याचा संशय, पोलीस CCTV तपासणार

पुण्याच्या खराड येथील ड्रग्स पार्टी प्रकरणात ससून रुग्णालयाचा अहवाल समोर आला आहे. पोलिसांनी प्रांजल खेमलकर आणि इतरांनी शुक्रवारी ही पार्टी केल्याचा संशय व्यक्त केला आहे. खराडमधील हॉटेल रूमचं सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासणार आहेत. खेमलकरांनी चार दिवसांसाठी हॉटेल रूम बुक केली होती. शनिवारी झालेल्या पार्टीत कोकेन सदृश आणि गांजा सदृश पदार्थांचं सेवन केल्याचा आरोप आहे. ससून रुग्णालयाच्या अहवालानुसार, अटकेत असलेल्या प्रांजल खेमलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यप्राशन केलं होतं. खेमलकरांसह सात जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. प्रांजल खेमलकर यांचा वैद्यकीय अहवाल माध्यमांना कसा देण्यात आला, असा सवाल त्यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांनी विचारला आहे. कुटुंब म्हणून अहवाल मागितला तर सरकार आणि पोलिसांतर्फे नकार दिला जातो, मात्र माध्यमांपर्यंत हा अहवाल कसा पोहोचला, असा सवाल त्यांनी केला. पोलिसांनी अहवाल कोर्टात सादर करू नये असं सांगितलं होतं, असंही रोहिणी खडसे म्हणाल्या. या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि खडसे कुटुंबियांवर टीका होत आहे. रोहिणी खडसे यांनी अहवालाची मागणी केली, मात्र पोलिसांनी तो अहवाल दिला नसल्याची तक्रार त्यांनी माध्यमांकडे केली. "कायद्यावर व पोलिस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल. जय महाराष्ट्र," असे त्यांनी म्हटले आहे. पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी कारवाई केली आहे. गुन्हा घडलाय आणि त्या गुन्ह्यावर पोलिसांनी कारवाई केली अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola