Pune Drugs Case : पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत काय घडलं? ABP Majha

Continues below advertisement

Pune Drugs News : पुण्यातील एफसी रोडवरील (FC Road) नामांकित हॉटेलमध्ये तरुणांचा ड्रग्जची (Drugs) नशा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यातील लिक्वीड लिजर लाउंजमध्ये उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप गिल (Sandeep Gill) यांनी दिली आहे. 

पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी एन्जॉयमेंटसाठी येऊन ड्रग्ज व अंमली पदार्थांचे सेवन करत पार्टी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पार्टीत ड्रग्स घेणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, चक्क हॉटेलमधील वॉश रुमममध्ये टॉयलेटजवळ बसून तरुण ड्रग्ज घेत असल्याचे दिसून आले आहे. या युवकांकडील हे ड्रग्ज, मॅफेनड्रग्स असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. 

काय म्हणाले पोलीस उपायुक्त संदीप गिल?

यावर पोलीस उपायुक्त संदीप गिल म्हणाले की, पुणे ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 8 जणांना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलांचा पुणे पोलीस शोध घेत आहेत.  या प्रकरणाची योग्य चौकशी होणार आहे. पार्टी करणाऱ्या ग्रुपने जेवण आणि दारूवर 80 ते 85 हजार खर्च केले आहेत. 40 ते 50 जणांची तपासणी होणार आहे. सीसीटीव्ही पाहून तपासणी केली जाणार आहे.  अनेकदा सूचना देऊनदेखील अंमलदार आणि अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवण्यात दिरंगाई दाखवली म्हणून दोन अधिकारी आणि दोन अमलदारांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती संदीप गिल यांनी दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram