Drishyam Murder: ‘तीन-चार वेळा दृश्यम पाहिला, पत्नीचा खून करून मृतदेह भट्टीत जाळला’, पुण्यात पतीची कबुली
Continues below advertisement
पुण्यात (Pune) ‘दृश्यम’ (Drishyam) चित्रपट पाहून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समीर जाधव (Sameer Jadhav) असे आरोपी पतीचे नाव असून, अंजली जाधव (Anjali Jadhav) असे मृत पत्नीचे नाव आहे. पोलीस उपायुक्त संभाजी कदम (DCP Sambhaji Kadam) यांनी सांगितले की, 'आरोपीने गुन्हा करण्यापूर्वी तीन ते चार वेळा 'दृश्यम' चित्रपट पाहिला होता'. चारित्र्याच्या संशयावरून समीरने हा कट रचला. २६ ऑक्टोबर रोजी त्याने पत्नी अंजलीला गळा दाबून ठार मारले आणि त्यानंतर एका खास तयार केलेल्या लोखंडी भट्टीत तिचा मृतदेह जाळला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेहाची राख नदीत फेकून दिली. यानंतर दोन दिवसांनी त्याने स्वतः वारजे (Warje) पोलीस ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली. मात्र, तांत्रिक तपासात आणि चौकशीतील विसंगतीमुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला आणि अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement