Mahayuti Rift: 'राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही', Tanaji Sawant यांचा Ajit Pawar गटावर हल्ला.
Continues below advertisement
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या टीकेमुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेशिवाय राहू शकत नाही, पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर कसा तडफडतो तसं राष्ट्रवादीला होतं', अशा शब्दात सावंत यांनी अजित पवार गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. धाराशिवमध्ये बोलताना सावंत यांनी आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढण्याचे संकेत दिले, ज्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या आघाडीत मतभेद उघड झाले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत सामील करून घेण्यावरही त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली, ज्यामुळे मित्रपक्षांमधील अंतर्गत तणाव समोर आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement