Pune Crime: 'दृश्यम ४ वेळा पाहिला', Samir Jadhav ने चारित्र्याच्या संशयावरून पत्नी Anjali ला भट्टीत जाळले
Continues below advertisement
पुण्यामध्ये 'दृश्यम' चित्रपटातून प्रेरणा घेऊन केलेल्या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. समीर जाधव (Samir Jadhav) नावाच्या व्यक्तीने आपली पत्नी अंजली जाधव (Anjali Jadhav) हिची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आरोपीने गुन्हा करण्यापूर्वी दृश्यम चित्रपट तीन ते चार वेळा पाहिला होता'. चारित्र्यावर संशय घेऊन समीरने पत्नीच्या हत्येचा कट रचला. २६ ऑक्टोबर रोजी फिरायला नेण्याच्या बहाण्याने त्याने पत्नीला शिंदेवाडीजवळील भाड्याने घेतलेल्या गोडाऊनमध्ये नेले. तिथे भेळ खात असताना तिचा गळा दाबून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह आधीच तयार केलेल्या लोखंडी भट्टीत जाळून टाकला. त्यानंतर दोन दिवसांनी, २८ ऑक्टोबर रोजी, त्याने स्वतः वारजे पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र, तपासादरम्यान त्याच्या वागण्यात विसंगती आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. अखेर कसून चौकशी केली असता, समीरने गुन्ह्याची कबुली दिली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement