Pune Crime News | Warje मध्ये 'Tak Gang' चा दरोड्याचा प्रयत्न, फिल्मी स्टाईलमध्ये एकाला अटक
पुण्यातील वारजे परिसरात पहाटे साडेतीन वाजता 'Tak Gang' च्या सदस्यांनी जबरी दरोडा आणि घरफोड्या करण्याच्या उद्देशाने प्रवेश केला होता. धारदार शस्त्रांसह जीप घेऊन आलेल्या या टोळीची माहिती एका व्यक्तीने पोलिसांना दिली. माहिती मिळताच वारजे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींपैकी एकाला पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये पकडले. अटक केलेल्या आरोपीचे नाव सोनू कपूर सिंग टाक असे आहे. त्याच्याकडून धारदार शस्त्रे आणि काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वारजे पोलिसांनी केली असून, दरोड्याचा मोठा कट उधळण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात कठोर पाऊले उचलली आहेत.