Pune Crime: 'दृश्यम' पाहून पत्नीची हत्या, आरोपीने रचला हत्येचा कट, पण CCTV मुळे फुटलं बिंग
Continues below advertisement
पुण्यामध्ये (Pune) 'दृश्यम' चित्रपटाच्या (Drishyam Movie) स्टाईलने पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी समीर जाधव (Sameer Jadhav) याने हा गुन्हा केला आहे. आरोपीने 'दृश्यम' चित्रपट तीन ते चार वेळा पाहिल्यानंतरच पत्नीच्या हत्येचा कट रचल्याची कबुली पोलिसांना दिली. आरोपी समीर जाधव याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते, तरीही तो पत्नी अंजलीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्याने खेड-शिवापूर (Khed-Shivapur) जवळ एक गोडाऊन भाड्याने घेतले, पत्नीला तिथे नेऊन तिचा गळा दाबून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तिथेच बनवलेल्या लोखंडी भट्टीत जाळला. त्यानंतर मृतदेहाची राख जवळच्या नदीत फेकून दिली आणि दोन दिवसांनी पत्नी हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांना त्याच्यावर संशय आला आणि अखेर चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement