Mahayuti Election : स्थानिक निवडणुकांवरून महायुतीत मतभेद? नेते आमनेसामने
Continues below advertisement
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपने आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. 'माझा मुलगा जय पवार बारामती नगराध्यक्षपदाचा उमेदवार असेल या चर्चा मी ऐकल्या आहेत, परंतु तसं काही होणार नाही', असं स्पष्टीकरण देत अजित पवार यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. शरद पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत न जाण्याचे आदेश दिले आहेत, तर भाजपने ११ नोव्हेंबरला मुंबईत निवडणुकीच्या रणनीतीसाठी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. काही ठिकाणी स्वबळावर तर काही ठिकाणी मित्रपक्षांसोबत लढण्याचे संकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी दिले आहेत. काँग्रेसनेही एकला चलो रे चे संकेत दिले असून, कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटाचे नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक समीकरणे बदलली आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement