Rupesh Marne Arrest : गजानन मारणे टोळीतील गुंड रुपेश मारणे याला अटक

Continues below advertisement
पुण्यातील कुख्यात गजानन मारणे टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मारणे टोळीतील गुंड आणि प्रमुख सूत्रधार असलेल्या रूपेश मारणे (Rupesh Marne) याला कोथरूड पोलिसांनी (Kothrud Police) अटक केली आहे. 'गजानन मारणे (Gajanan Marne) टोळीचा गजानन मारणे नंतर सूत्र चालवणारा रूपेश मारने हा प्रमुख सूत्रधार आहे,' अशी माहिती समोर आली आहे. कोथरूड येथील एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गजानन मारणेसह रूपेशवर गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पोलिसांना चकवा देत फरार होता. अखेर, मुळशी तालुक्यातील आणगावमधून कोथरूड पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पुणे पोलीस (Pune Police) संघटित गुन्हेगारीविरोधात (Organised Crime) कठोर पाऊले उचलत असून, ही कारवाई त्याचाच एक भाग मानली जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola