Pune Congress Protest : पुण्यातील आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांना आपापसात गोंधळ
पुण्यामध्ये काँग्रेसतर्फे आयोजित आंदोलनात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटीच्या ओबीसी विभागानं ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा आयोजित केला होता. मात्र मोर्चा सुरू असताना मोर्चात घुसलेल्या एका व्यक्तीनं काळा झेंडा दाखवला आणि काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे इतर काँग्रेस कार्यकर्त्यांची त्याचासोबत धक्काबुक्की झाली आणि या मोर्चात काही काळ गोंधळ पाहायला मिळाला.
Tags :
Congress Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Pune Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv