Pune:पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम,तीन जागांवर राष्ट्रवादीचा विजय
Continues below advertisement
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम आहे. जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत सातपैकी तीन जागांवर राष्ट्रवादीचा विजय झालाय. या निवडणुकीतील 21 पैकी 14 जागा आधीच बिनविरोध निवडून आल्यात. सातपैकी तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेत. सुनिल चांदेरे, आमदार अशोक पवार, विकास दांगट अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची नावे आहेत. तर बिनविरोध निवडून आलेल्या 14 संचालकांपैकी 13 संचालक हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम राहीले असले तरी पतसंस्था गटामधून भाजपच्या प्रदीप कंद यांनी विजय मिळवलाय. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश घुलेंचा पराभव केलाय.
Continues below advertisement
Tags :
Congress Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Pune Marathi News ABP Maza Top Marathi News पुणे महाराष्ट्र ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron महाराष्ट्र पुणे Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News