Pune Chakan Rainfall : पुण्यात धोधो बरसला, चाकणमध्ये चहुबाजूंनी वाहतूक कोंडी ABP MAJHA
पुणे-नाशिक-तळेगाव-शिरपूर महामार्गावरील चाकणच्या चौकात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. या चौकातून जाणाऱ्या चारही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. ही स्थिती केवळ चाकणपुरती मर्यादित नसून, आज अनेक महामार्गांवर बघायला मिळत आहे. खासकरून पावसानं ठिकठिकाणी जबरदस्त अशी हजेरी लावली आहे, त्यामुळे वाहतुकीचा हा मोठा खोळंबा झाला आहे. पुण्यातल्या चाकणमधील ही परिस्थिती असून, वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून, वाहनांचा वेग मंदावला आहे. यामुळे प्रवाशांना नियोजित स्थळी पोहोचण्यास विलंब होत आहे. वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून उपाययोजना केल्या जात आहेत.