Nagpur Floods | उमरेड तालुक्यात Makar Dhokda, Paradgaon तलाव ओव्हरफ्लो, प्रशासनाचा इशारा!

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात सततच्या पावसामुळे मकर धोकडा तलावापाठोपाठ आता पारडगाव तलावही पूर्ण क्षमतेने भरला आहे. या दोन्ही तलावांमधून पाणी ओव्हरफ्लो होत आहे. विशेषतः पारडगाव तलावाच्या चांडव्यावरून पाणी वाहत आहे. यामुळे परिसरातील छोट्या नाल्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने या भागातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून, आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola