Pune : पुण्यात एका लग्नसोहळ्यात यजमानांनी चक्क बारबाला नाचवल्याचा प्रकार, पैसे उधळण्याचा प्रकार
Continues below advertisement
पुण्यात एका लग्नसोहळ्यात यजमानांनी चक्क बारबाला नाचवल्याचा प्रकार समोर आलाय. पुण्यातल्या सेनापती बापट रस्त्यावरील वडारवाडी भागात एका लग्नसोहळ्यात हा प्रकरा घडलाय. वडारवाडी भागात भर रस्त्यात हा लग्नाचा मंडप टाकण्यात आला होता. आणि भररस्त्यातच हा बारबालांच्या नृत्याचा आणि त्यांच्यावर पैसे उधळण्याचा आक्षेपार्ह प्रकार सुरू होता. त्यामुळे या सगळ्या प्रकारावर पोलिसांनी कारवाई का केली नाही असा संतप्त सवाल पुणेकर विचारताहेत.
Continues below advertisement