Marathi Language : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा या मागणीसाठी महाराष्ट्राचं शिष्टमंडळ दिल्लीत
Continues below advertisement
मराठी भाषेला तात्काळ "अभिजात" दर्जा मिळावा या मागणीसाठी महाराष्ट्राचं शिष्टमंडळ आज दिल्लीत जाणार आहे. मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखालील या पथकात भूषण गगराणी, श्रीरंग गोडबोले यांच्या काही अधिकारी असणार आहेत. हे शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि जी. कृष्णा रेड्डी यांची भेट घेणार आहेत, यावेळी महाराष्ट्रातील नामवंत लेखक, विचारवंत आणि मराठी कलाकार अशा अनेक मान्यवरांची स्वाक्षरी केले पत्रंही केंद्रीय मंत्र्यांना देण्यात येणार आहेत. दुसरीकडे महाराष्ट्राचं पथक राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आणखी चार हजार पत्रं सोपवणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मान्यवरांनी या पत्रांवर स्वाक्षरी केलीय.
Continues below advertisement