Porsche Car Accident Update : पोर्शे अपघातातील कार अगरवाल कुटुंबियांना परत मिळणार ?
Pune Porsche Car Accident : पुण्यातील धनाढ्य बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराने पुण्यातील कल्याणी नगर परिसरात दोघांना चिरडल्यानंतर संपूर्ण राज्यसह देशभरामध्ये खळबळ उडाली होती. या प्रकरणामध्ये विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला असला, तरी अपघातग्रस्त पोर्शे कार अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे आलिशान कार परत मिळण्यासाठी आता अग्रवाल कुटुंबीयांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.
अग्रवाल कुटुंबीयांनी पोर्शे कार परत मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे पोर्शे कारच्या सुटकेचा निकाल 28 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. अपघातातील कार परत मिळण्यासाठी अग्रवाल कुटुंबीयांकडून बाळ न्याय मंडळात अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर 28 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे कार अग्रवाल कुटुंबियांना कधी परत मिळणार याबाबत त्या दिवशी निर्णय होण्याची शक्यता आहे.