Pune: अ. भा मराठी साहित्य महामंडळाकडून घोषणा, अध्यक्षपदी भारत सासणे ABP Majha
Continues below advertisement
९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड झालीय. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही घोषणा केलीय. लातूरच्या उदगीरमध्ये हे साहित्य संमेलन होणार आहे. चार महिन्याच्या आत पुढील साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती नाशिक इथल्या साहित्य संमेलनाच्या समारोपावेळीच देण्यात आली होती. त्यामुळं येत्या तीन महिन्यात संमेलनाची तारीख निश्चित होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होताच सासणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. सासणे यांचं मराठी साहित्यातील योगदान अमूल्य आहे. कला आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल सासणे यांना विविध पुरस्कारांनी सासणे यांना गौरवण्यात आलंय.
Continues below advertisement