Vashi Karnatak Bhavan Protest : वाशीतील कर्नाटक भवनासमोर ठाकरे गटाचं आंदोलन

कर्नाटकातल्या बेळगावात काल महाराष्ट्रातल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं नवी मुंबईत रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. वाशीतल्या कर्नाटक भवनासमोर ठाकरेंच्या शिवसेनेनं कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. यावेळी शिवसैनिकांकडून कर्नाटकविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमधली ताणलेले संबंध लक्षात घेता नवी मुंबई पोलिसांनी वाशीच्या कर्नाटक भवनासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola