Pravin Ashtikar : मनपा कर्मचाऱ्यांकडून माझ्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ काम बंद : प्रवीण आष्टीकर
अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाइफेक झाल्यावर सगळीकडे निषेध केला गेला. याप्रकरणी आयुक्तांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आमदार रवी राणासह 11 जणांवर गुन्हे दाखल झाले. यावर मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्याशी बातचीत केली तर त्यांनी सांगितले की, अमरावती राजापेठ अंडरपास खाली पाणी साचते अशी तक्रार मला फोनवर देण्यात आली. त्याची पाहणी करण्यासाठी गेलो असता अचानक काही महिला आणि पुरुषांनी माझ्यावर हा हल्ला केला. अंगावर शाई फेकण्यात आली आणि माझ्या शासकीय वाहनाचे टायर देखील पंक्चर करण्यात आले. हल्ला झाल्याची माहिती मिळताच मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं आणि पोलीस स्थानकावर मोर्चा काढण्यात आला. आज देखील राज्यातील सर्व नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये काम बंद असून महसूल विभागाच्या कर्मचारी काळ्याफिती लावून निषेध व्यक्त करणार आहेत. राजापेठ उड्डाणपुलावर बसवलेला शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृत असल्याने तो आम्ही हटवला असेही आष्टीकर म्हणालेत