Diwali 2021 : देह व्यापारापासून ते मातीच्या पणत्या रंगवण्यापर्यंत, भिवंडीतील महिलांची अनोखी कहाणी
Continues below advertisement
देह व्यापार करणाऱ्या महिलांची वस्ती म्हणजे सदैव सावजाला खुणावणारे हात नजरेस पडतात परंतु भिवंडी शहरातील हनुमान टेकडी या वस्तीतील महिलांसाठी काम करणाऱ्या श्री साई सेवा संस्थेच्या डॉ.स्वाती सिंग खान यांनी या महिलांना दिवाळीसाठी दिवे रंगवून ते विक्री करण्याची संधी मिळवून दिली आहे. त्यामुळे येथील महिला मातीच्या पणत्या रंगसंगतीन सजवून त्या संस्थेच्या माध्यमातून विक्री करीत असून आता तब्बल 5 हजार दिवे विक्रीसाठी तयार आहेत. मागील चार वर्षात या भागातील महिलांमध्ये श्री साई सेवा संस्था आरोग्य शिक्षण, जनजागृती व समुपददेशनाद्वारे केलेल्या कार्यतून येथील 25 अधिक महिलांना या नरकयातना भोगायला लागणाऱ्या व्यवसाया पासून परावृत्त करीत त्यांना नव्या व्यवसायाची संधी दिली आहे .या कामांमुळे महिला लिलीया हाताने दिवे रंगविण्यात गर्क झाले आहेत.
Continues below advertisement