Proof Against Walmik Karad : वाल्मिक कराडने तीन आयफोनमधून डिलीट केलेला डेटा रिकव्हर
Proof Against Walmik Karad : वाल्मिक कराडने तीन आयफोनमधून डिलीट केलेला डेटा रिकव्हर
संतोष देशमुख प्रकरणातील (Santosh Deshmukh Case) आरोपी वाल्मिक कराड (Walmik karad) आणि विष्णू चाटे (Vishnu Chate) फरार असताना दिंडोरीतील स्वामी समर्थ केंद्र (Swami Samarth Kendra) येथे आल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी केला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने पूर्ण झाले असून या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. त्यातच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) या आज रविवारी (दि. 09) नाशिकमध्ये दाखल झाल्या असून स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
खंडणी प्रकरणात जेव्हा वाल्मिक कराड याचा पोलीस शोधत होते, तेव्हा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे आण्णासाहेब मोरे म्हणजे गुरू माऊली यांच्या आश्रमात 15 आणि 16 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे मुक्कामाला होते आणि 17 तारखेला ते आश्रमाच्या बाहेर निघून गेले, असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला होता. दिंडोरीच्या आश्रमात जर त्यांना आश्रय दिलं गेला असेल तर तेथील जे प्रमुख आहे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांना देखील सहआरोपी केलं पाहिजे, असेही त्यांनी म्हटले होते. यानंतर दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्राच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. आयडीचे अधिकारी आमच्या केंद्रात तपासासाठी आले होते. त्यांनी आमचे सीसीटीव्ही तपासले. त्यात वाल्मिक कराड 16 तारखेला दर्शनासाठी आले आणि निघून गेलेत. दत्तजयंतीचा सप्ताह आमच्याकडे होता तेव्हा ते आले होते. त्यावेळी असंख्य भाविक आमच्याकडे आले होते. त्यामध्ये कोण आले हे आम्हाला माहिती नव्हते, असे स्वामी समर्थ केंद्राचे प्रतिनिधी आबासाहेब मोरे यांनी म्हटले होते.