Zero Hour निवडणुकांमुळे अपूर्ण असूनही विमानतळाचे उद्घाटन,विरोधकांचा आरोप;जनतेला काय वाटतं?

Continues below advertisement
प्रकल्पाच्या उद्घाटनावरून सुरू झालेल्या राजकारणावर चर्चा झाली. भाजपाचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे, शिवसेना प्रवक्ता राजू माघमारे आणि काँग्रेस प्रवक्ता बालाजी गाडे यांच्याशी संवाद साधण्यात आला. विरोधकांना काही काम राहिले नाही म्हणून चांगल्या कामाला विरोध करत असल्याचे एक मत मांडले गेले. तर काम पूर्ण झाल्यावर उद्घाटन करणे योग्य होते, घाईघाईत विमानतळाचे उद्घाटन करणे म्हणजे श्रेय घेण्याचा प्रयत्न असे दुसरे मत व्यक्त झाले. निवडणुका आल्यामुळे भाजपला घाई झाली आहे, अशी प्रतिक्रिया एका प्रेक्षकाने दिली. "भुयारी मेट्रोमध्ये जसं पाणी घुसलं, तसंच या विमानतळाची स्थिती होणार आहे. घाईत काम होत असल्यामुळे," अशी चिंता एका प्रेक्षकाने व्यक्त केली. प्रकल्प चांगला असला तरी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्घाटन करणे हा राजकीय हेतू असल्याचे मत अनेकांनी मांडले. भाजप प्रत्येक गोष्ट फक्त राजकीय फायदा डोळ्यासमोर ठेवूनच करते, असेही म्हटले गेले. राम मंदिराचे उद्घाटन अपूर्ण असतानाच केले, ते अजूनही पूर्ण झालेले नाही, अशी तुलनाही करण्यात आली. महानगरपालिकेच्या निवडणुकीत काही काम केले हे दाखवण्यासाठी लहान मुलांसारखी चलबीचल सुरू असल्याचे मत एका प्रेक्षकाने नोंदवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे काय झाले, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola