Aryan Khan : शाहरूख खानच्या रेड चिली आणि नेटफ्लिक्सला दिल्ली हायकोर्टाची नोटीस
Continues below advertisement
आयआरएस समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यात 'ध बॅड ऑफ बॉलिवूड' या वेब सीरिजवरून नवा वाद सुरू झाला आहे. समीर वानखेडे यांनी या वेब सीरिजविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. दिल्ली हायकोर्टाने ही याचिका स्वीकारली आहे. याचिकेवर निर्णय देताना हायकोर्टाने शाहरुख खानच्या Red Chillies कंपनी आणि Netflix ला नोटीस बजावली आहे. 'ध बॅड ऑफ बॉलिवूड' या सीरिजद्वारे आपली बदनामी केल्याचा आरोप समीर वानखेडे यांनी याचिकेतून केला आहे. दिल्ली हायकोर्टाने नोटीशीला तीन आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी तीस ऑक्टोबरला होणार आहे. या याचिकेमुळे वेब सीरिजच्या प्रदर्शनावर आणि त्यातील आशयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वानखेडे यांनी केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement