Project Cheetah: 'जानेवारीत चित्ते भारतात येतील', भोपाळच्या वन अधिकाऱ्याची माहिती

Continues below advertisement
भारताच्या 'प्रोजेक्ट चित्ता' (Project Cheetah) अंतर्गत आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) लवकरच आफ्रिकेतील बोत्सवाना (Botswana) देशातून आठ नवीन चित्ते दाखल होणार आहेत. भोपाळमधील एका वन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'हे चित्ते येत्या जानेवारीमध्ये भारतात आणले जातील'. सप्टेंबर २०२२ मध्ये नामिबियातून (Namibia) आठ आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) बारा चित्ते आणण्यात आले होते. भारतात जन्मलेल्या पिल्लांमुळे आणि या नवीन येणाऱ्या चित्त्यांमुळे कुनोमधील संख्या वाढणार आहे. मधल्या काळात काही चित्त्यांचा मृत्यू झाला असला तरी, आता हे प्राणी भारतीय वातावरणाशी जुळवून घेत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर नुकतेच दक्षिण आफ्रिकेच्या एका पथकाने कुनो पार्क आणि गांधी सागर अभयारण्याची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. सध्या भारतात २७ चित्ते असून, त्यात भारतात जन्मलेल्या १६ बछड्यांचा समावेश आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola