Matoshree Drone Row: 'कोणत्या सर्वेक्षणामुळे घरांमध्ये डोकावण्याची परवानगी मिळते?', Aaditya Thackeray यांचा सवाल

Continues below advertisement
ठाकरे कुटुंबियांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' (Matoshree) बाहेर ड्रोन (Drone) घिरट्या घालताना दिसल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेनंतर शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सुरक्षेचा आणि गोपनीयतेचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर टीका केली आहे. 'उद्योगपतीच्या घराखाली जिलेटिनच्या कांड्या ठेवणारे हे सरकार नाहीये तर सर्वसामान्यांना सुरक्षा पुरविणारे हे सरकार आहे', असा टोला सत्ताधारी पक्षाकडून ठाकरे गटाला लगावण्यात आला. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ड्रोन MMRDA च्या पॉड टॅक्सी (Pod Taxi) प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचा भाग होता आणि यासाठी रीतसर परवानगी घेण्यात आली होती. मात्र, 'कोणत्या सर्वेक्षणामुळे तुम्हाला घरांमध्ये डोकावण्याची परवानगी मिळते?' असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. रहिवाशांना या सर्वेक्षणाची पूर्वकल्पना का दिली नाही, असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. या संपूर्ण प्रकरणावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola