Project Cheetah: Botswana मधून आणखी ८ चित्ते भारतात, Kuno नॅशनल पार्कमध्ये दाखल होणार
Continues below advertisement
भारताच्या 'प्रोजेक्ट चित्ता' (Project Cheetah) अंतर्गत आणखी आठ चित्ते लवकरच भारतात दाखल होणार आहेत. एका वरिष्ठ वन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'आफ्रिका खंडातील बोत्सवाना (Botswana) या देशातून आणखी आठ चित्ते पकडण्यात आले असून त्यांना लवकरच भारतामध्ये आणले जाईल'. यामध्ये दोन नरांचा समावेश आहे आणि भारतात पाठवण्यापूर्वी त्यांना एक महिना विलगीकरणात ठेवण्यात येईल. हे चित्ते जानेवारी महिन्यात मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात (Kuno National Park) दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) पाच सदस्यीय तज्ज्ञ पथकाने नुकतीच कुनो नॅशनल पार्क तसेच मंदसौर-नीमच सीमेवरील गांधीसागर अभयारण्याची (Gandhisagar Sanctuary) पाहणी केली. या पथकाने चित्ता संवर्धनासाठी केंद्र आणि मध्यप्रदेश सरकारच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement