Bacchu Kadu Majha Katta : 'रोज 12 शेतकरी मरतात तेव्हा कोर्ट कुठे असतं?', बच्चू कडूंचा संतप्त सवाल
Continues below advertisement
नागपूरमधील शेतकरी आंदोलनादरम्यान, न्यायालयाने रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिल्यानंतर नेते बच्चू कडू यांनी न्यायव्यवस्थेच्या भूमिकेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा न्यायालय सरकारला आदेश देत नाही, पण शेतकरी एक दिवस रस्त्यावर उतरले तर तात्काळ आदेश दिले जातात', असा संतप्त सवाल बच्चू कडू यांनी केला. रस्त्यांवरील आंदोलनाची दखल घेतली जाते, पण रोज सरासरी १२ पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्याकडे का लक्ष दिले जात नाही, असे म्हणत त्यांनी न्यायालयाच्या दुहेरी निकषावर नाराजी व्यक्त केली. आम्ही न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो आणि तुरुंगात जायला तयार आहोत, पण आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement