Nanded ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप, खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट; सामान्य माणूस त्रस्त

गेल्या दहा दिवसापासून एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप असल्या कारणाने ग्रामीण भागाची नाडी आता बंद पडलीय. परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या ह्या आंदोलनाच्या होळीत, खासगी वाहतूक दारांची मात्र दिवाळी होत असल्याचे चित्र आहे. कारण ऐन दिवाळसणात एसटी वाहतूक बंद असल्या कारणाने प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. आणि या गोष्टीचा फायदा, खासगी काळी पिवळी टॅक्सी चालक,खासगी लॅक्सजरी बस चालक उचलताना दिसत आहेत. कारण ह्या खासगी वाहतूक दारांकडून दामदुप्पट भाडे घेऊन प्रवाशांची लूट होत असल्याचे चित्र सध्या नांदेड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. त्यामुळे एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची होळी  चालू असताना खासगी वाहतूकदाराची मात्र जास्तीचे भाडे आकारून दिवाळी होत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola