Private Bus For Konkan : चाकरमान्यांची लूट; खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांचा पर्दाफाश करणारं Sting Opration
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPrivate Bus For Konkan : चाकरमान्यांची लूट; खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांचा पर्दाफाश करणारं Sting Opration
गणपतीसाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची अक्षरशः लूट सुरू आहे. खासगी ट्रॅव्हल्सवाले प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडं आकारत आहेत. विशेष म्हणजे या प्रकाराचं खापर ते सरकारवरच फोडत आहेत. एबीपी माझाच्या प्रतिनिधीने या सगळ्या प्रकाराचा पर्दाफाश केलाय. सरकार गोळा करत असलेल्या टॅक्समुळे होणारं नुकसान याच सीझनमध्ये भरून निघतं अशी शहाजोग भूमिका हे ट्रॅव्हल्सवाले घेत आहेत. एबीपीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा दावा रेकॉर्ड झालाय. 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधीने कोकणात जाणार्या ट्रॅव्हल्सच्या परळ, दादर या प्रमुख थांब्यांवरील बुकिंग तिकिटवाल्यांकडे जाऊन प्रवाशांकडून आकारण्यात येणार्या तिकिटाबाबत चौकशी केली. त्यावेळी अनेक बुकिंग चालकांनी वेगवेगळे दर बुकिंगचे सांगितले. नेमकं काय संवाद झाला आहे ते पाहुयात