Prithviraj Patil On Sudhir Gadgiil : जयश्रीताई तुमसे बैर नही, सुधीर गाडगीळ तुम्हारी खैर नही, पृथ्वीराज पाटील यांचा एल्गार

Prithviraj Patil On  Sudhir Gadgiil : जयश्रीताई तुमसे बैर नही, सुधीर गाडगीळ तुम्हारी खैर नही, पृथ्वीराज पाटील यांचा एल्गार

  सांगली विधानभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी पक्ष उमेदवार असलेल्या जयश्री पाटील या आपल्या मोठ्या बहिणी आहेत असं म्हणत "जयश्री ताई तुमसे बैर नाही, सुधीर दादा गाडगीळ अब तुम्हारी खैर नही" या शेरच्या माध्यमातून पृथ्वीराज पाटील यांनी सुधीर घाडगे यांना एक प्रकारे इशारा दिला आहे. दुसरीकडे  काँग्रेस मध्ये जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली असली तरी ताकदीने निवडणूक लढवण्याचा इरादा या प्रचार शुभारंभच्या माध्यमातून पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केलाय. यावेळी पृथ्वीराज पाटील  यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार आणि भाजप पुरस्कृत  अपक्ष उमेदवार यांना पराभव करुन विधानसभेत जाणार म्हणजे जाणार असे छातीठोकपणे सांगितले. तसेच  मला एकदा आमदारकीची संधी द्या , सांगलीचा आमदार कसा असतो हे दाखवून देतो असे म्हणत पृथ्वीराज पाटील यांनी  भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांना आव्हान दिलंय. भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार यांना दिलेले मत  हे भाजपलाच मत दिल्यासारखे होईल , त्यामुळे कॉंग्रेसलाच मतदान करा असे आवाहन काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी मतदाराना केले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola