Prithviraj Chvhan On Ajit Pawar :70 हजार कोटींचा घोटाळा हा शब्द वापरला नव्हता
Prithviraj Chvhan On Ajit Pawar :70 हजार कोटींचा घोटाळा हा शब्द वापरला नव्हता
सिंचन घोटाळा हा अजित पवारांची पाठ काही सोडत नाही. मी जेंव्हा श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश दिले होते तेंव्हा माझ्या त्या आदेशात 70 हजार कोटी शब्द नव्हता. श्वेतपत्रिका म्हणजे चौकशी नाही. अजित पवारांच्या 2010-2011 च्या आर्थिक पहाणी अहवालामध्ये 70 हजार कोटी खर्च झाले सिंचनाची टक्केवारी18.0 वरुन 18.1 झाली हे अजित पवारांच्या अहवालात नमुद करण्यात आले होते. मी मुख्यमंत्री झाल्यावर ते पाहिले. तेंव्हा मला धक्का बसला. मी सिंचन खात्याला सांगितले की हे बरोबर आहे का ? 70 हजार कोटी खर्च केले.70 हजार खर्च केले हे अजित पवारांच्याच अहवालात होते. आणि सिंचनाच्या टक्केवारीत फार वाढ झाली नाही. म्हणून काय वस्तूस्थिती आहे, वस्तुस्थिती अहवाल शासनाला सादर करा हे मी सिंचन खात्याला सांगितले. मला चौकशी करायची असती तर मी अन्टीकरप्शन विभागाला दिली असती. पुन्हा चुका होऊ नयेत हा माझा त्यामागचा उद्देश होता. नंतर त्याची चौकशी झाली. विधीमंडळात त्याची चर्चा झाली. आणि या प्रकरणाची विदर्भ सिंचन महामंडळाच्या घोटाळ्याची खुली चौकशी व्हावी असा एक अहवाल खालून आला आणि तसा तो अहवाल गृहमंत्र्यांना सादर केला गेला. मंग अन्टीकरप्शनला त्याची चौकशी करण्याचे आदेश द्या असे लिहिले होते. गृहमंत्र्यांनी आपल्या स्तरावर मान्यता दिली याचा उल्लेख आज अजित पवारांनी तासगावच्या केला आहे. ती फाईल आपल्याजवळ आली नाही. त्या फाईलवर माझी कसलीही सही नाही. त्यामुळे मी सिंचनच्या प्रकरणात कोणतीही चौकशी लावली नव्हती. नाहक माझा बळी घेतला. अजित पवारनी 2014 ला माझे सरकार पाडले आणि भाजपची मुहुर्तमेड केली. ही वस्तूस्थिती आहे. ती फाईल मी पुन्हा पाहिली नाही. आणि ती फाईल गृहमंत्र्यांच्या स्थरावर मान्यता देऊन ती खाली गेली. गृहमंत्र्यांनी कोणाला विचारले का की स्वताच्या स्थरावर हे माला माहिती नाही. अजित पवार बोलले ते खरं आहे. माझा काय दोष आहे हे जर सांगितले असते तर बरे झाले असते. मी सिंचन प्रकरण असेल वा राज्यसरकारी बँक असेल मी राज्याच्या हिताचे निर्णय घेतले. त्याची मला शिक्षा भोगायला लागली. त्याची मला चिंता नाही. तो 70 हजार कोटीचा घोटाळा होता, 42 हजार कोटीचा घोटाळा होता हे नरेंद्र मोदींनीच तपासून पाहिले आहे. त्यामुळे आता कोणी शिक्कामोर्तब करायची गरज नाही.