Sangli : सांगलीतील प्राध्यापकाने मिळवले 240 पेटंट, आता बनवला मल्टीपल कंडेनसर

Continues below advertisement
सांगलीतील बिरनाळे कॉलेज मधील सचिन लोकापुरे या  प्राध्यापकाने मेडिकल सूक्ष्मदर्शक या क्षेत्रात 240 पेटंट मिळवले आहे. त्यामुळे 'पेटंट मॅन' म्हणून या प्राध्यापकाची ओळख बनत आहे. सध्या या प्राध्यापकाने आणखी एक प्रयोग करत प्रयोगशाळा आणि फार्मस्टिकल कंपनीत वापरले जाणाऱ्या कंडेनसर मध्ये एकावेळी अनेक टेस्ट करता येतील असे मल्टीपल कंडेनसर तयार केलाय. शिवाय या मल्टिपल कंडेनसरचा  पेटंट देखील मिळवला आहे. या मल्टीपल कंडेनसरमुळे एका वेळी अनेक टेस्ट करणे शक्य होणार असून यामुळे प्रयोग करण्यास आणि त्या प्रयोगाचे निरीक्षण करण्यास मोठी मदत होणार आहे. संशोधन क्षेत्र किंवा विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत या  मल्टीपल कंडेनसरची मोठी मदत होऊ शकते. एकावेळी एकाच कंडेनसरच्या माध्यमातून 5 हुन अधिक टेस्ट करणे आणि त्या टेस्टचे परीक्षण करून निष्कर्ष काढणे या मल्टीपल कंडेनसरच्या माध्यमातून शक्य होऊ शकते, असा दावा प्राध्यापक सचिन लोकापूरे यांनी केलाय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram