Presidential Elections 2022 : Draupadi Murmu यांच्यासाठी Eknath Shinde यांची Congress-NCP नेत्यांवर नजर

Continues below advertisement

Eknath Shinde : राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना राज्यातील दोनशे आमदार मतदान करतील असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय. सध्या भाजप आणि शिंदे गटाचे मिळून एकूण 170 आमदार आहेत. तर शिवसेनेनं मुर्मू यांना पाठिंबा दिल्यामुळे ही संख्या 185 पर्यंत पोहोचलीय. म्हणजेच एकनाथ शिंदे यांना 200 चा पल्ला गाठण्यासाठी आणखी 15 आमदारांची गरज लागणार आहे. यासाठी शिंदेंची नजर विरोधी बाकावर आहे असं बोललं जातंय. राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदार फोडणार का याकडं लक्ष लागलंय. काँग्रेसचे विधानसभेत 44 तर राष्ट्रवादीचे 43 सदस्य आहेत. त्यामुळे ते 15 आमदार कोणत्या पक्षाचे असतील याबाबत चर्चा सुरु झाल्यात.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram