Aditya Thackeray Ayodhya: आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तयारी सुरु ABP Majha

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौर्याची तयारी सुरू झाले...10 जूनरोजी आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तत्पूर्वी शिवसेनेचे नाशिकमधील पदाधिकारी अयोध्येत पोहोचले आहेत.. अयोध्येत आदित्य ठाकरेंच्याहस्ते शरयू नदीची आरती होणार आहे.. तसंच रामलल्लासह इतर मंदिरांचं आदित्य ठाकरे दर्शन करणार आहेत.. अयोध्येत पोहोचलेल्या या पदाधिकाऱ्यांनी घाटाची पाहणी केली आणि इथे आरतीही केली... आदित्य ठाकरे यांनी ऐनवेळी सभा घेण्याचं ठरवल्यानं पदाधिकाऱ्यांकडून सभास्थळ, होर्डिंग लावण्याच्या जागा याची पडताळणी केली जाणार आहे.. हॉटेल बुकिंग, भाविकांची राहण्याची सोय या साऱ्याचीही चाचपणी होणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola