Pre Monsoon Rain Expected in Maharashtra | गुरुवारपासून 3 दिवस महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज
Continues below advertisement
केरळ ते मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा होता. तो सध्या विरुन गेलाय. पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांत पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातही 18 ते 20 मार्च या काळात हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय, एक-दोन दिवसांत कमाल तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement