Pravin Tarde on Nasrapur : एक घाव दोन तुकडे करा ना! नसरापूर घटनेवर प्रविण तरटे संतप्त

Continues below advertisement

Pravin Tarde on Nasrapur : एक घाव दोन तुकडे करा ना! नसरापूर घटनेवर प्रविण तरटे संतप्त 

पुणे (Pune) जिल्ह्यातील भोर (Bhor) तालुक्यातील नसरापूर येथे 4 वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. आता अखेर महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाला जाग आली असून, आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.

Pune Bhor Crime news: नेमकी घटना काय?

1 मे रोजी महाराष्ट्र दिनी 65 वर्षीय नराधमाने 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून शिवाजीनगर न्यायालयाने त्याला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र रोष आहे. आरोपीला कठोर शिक्षा आणि शासनाकडून ठोस आश्वासनाच्या मागणीसाठी शनिवारी रात्री नसरापूरच्या ग्रामस्थांनी पीडित चिमुकलीचा मृतदेह थेट पुण्यातील नवले पुलावर आणला. या आंदोलनामुळे पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प झाली होती. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते. अखेर रात्री उशिरा पोलिसांनी बळाचा वापर आणि लाठीमार करत आंदोलकांना पांगवले, त्यानंतर रात्री उशिरा चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola