Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, जनतेनं सरकारला ताब्यात घेतलं पाहिजे

Continues below advertisement

Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, जनतेनं सरकारला ताब्यात घेतलं पाहिजे 
Pune Navale bridge Rasta Roko: पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका नराधमाने अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली होती. या नराधमाने मुलीला गायीचं वासरु दाखवतो, असे सांगून गोठ्यात नेले आणि तिच्यावर अत्याचार केले. यानंतर आरोपीने तिची हत्या (Murder news) केली. त्याने यानंतर मुलीचा मृतदेह गोठ्यातील शेणात लपवून पळ काढला होता. यानंतर संध्याकाळी मुलगी घरी आली नाही तेव्हा शोधाशोध सुरु झाली. त्यावेळी गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी मुलीला गोठ्याकडे घेऊन गेल्याचे दिसले आणि या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला होता. या सगळ्यानंतर नसरापूरसह (Narsapur news) भोर तालुक्यात संतप्त पडसाद उमटले होते. राज्य सरकारकडून ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे शनिवारी संध्याकाळी कुटुंबीयांनी मुलीचा मृतदेह घेऊन पुण्याच्या नवले पूलावर (Navale bridge) रास्ता रोको केला होता. यावेळी आंदोलकांनी तब्बल चार तास मुंबई-बंगळुरु महामार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. या आंदोलकांना रस्त्यावरुन दूर करण्यासाठी पोलीस सातत्याने त्यांच्याशी चर्चा करत होते. मात्र, आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याठिकाणी येत नाहीत, तोपर्यंत रस्त्यावरुन हटणार नाही, असा ठाम पवित्रा घेतला होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola