Pravin Tarde Ahilyanagar : लोक कला जिवंत ठेवण्यासाठी मोठं पाऊल, प्रवीण तरडेंनी दिली माहिती
Pravin Tarde Ahilyanagar : लोक कला जिवंत ठेवण्यासाठी मोठं पाऊल, प्रवीण तरडेंनी दिली माहिती
अहिल्यानगर येथे आय लव्ह नगर या संस्थेच्या पुढाकारातून "फोक वंत" या नवीन व्यासपीठाची सुरुवात करण्यात आली आहे... सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक कला लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होणार आहे...सिने अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते या डिजिटल व्यासपीठाचा शुभारंभ करण्यात आला.. राज्यातील लोप पावत चाललेल्या लोककला या व्यासपीठाच्या माध्यमातून पुन्हा सर्वांच्या समोर याव्यात पारंपारिक कला प्रकार सर्वांना समजावेत, या कलाप्रकारातील कलाकार आणि नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने फोकवंत हे व्यासपीठ खुलं करण्यात आलं असून या व्यासपीठावर जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील लोक कलावंत आपली कला सादर करणार आहेत... या व्यासपीठाचा उपयोग सर्वांना होईल, शिवरायांच्या काळात स्वराज्यासाठी लोक कलावंतांनी खूप मोलाचं योगदान दिलेल आहे...फ्लॅट संस्कृतीमुळे लोककला काही दूर जात होती , मात्र "फोकवंत"या प्लॅटफॉर्ममुळे पुन्हा ही सर्वांपर्यंत पोहोचणार आहे असं प्रवीण तरडे यांनी म्हटल आहे.