Nigerian Arrested: टीप मिळताच पोलिसांनी सापळा रचला, MD ड्रग्जसह नायजेरियनला अटक
Nigerian Arrested: टीप मिळताच पोलिसांनी सापळा रचला, MD ड्रग्जसह नायजेरियनला अटक
ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अंमली पदार्थ तस्कर आणि विक्री करणाऱ्याच्या विरोधात ठोस कारवाईचे आदेश दिल्यानंतर ठाणे अंमली प[पदार्थ विरोधी पथकाने मागोवा सुरु केला. पथकाला रविवारी १२ जानेवारी, २०२५ रोजी नायजेरियन इसम हा अंमली पदार्थ विक्रीसाठी डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार असलायची माहिती मिळाली. त्यानुसार अंमली विरोधी पथकाने रात्री ९-३५ वाजण्याच्या सुमारास रिवरवुड पार्क समोर, देसाई नाका, खिडकाळी रोड, शिळडायघर, येथे सापळा रचला. घटनास्थळी नायजेरियन इसम नॉन जेम्स फान्सिस उर्फ ओनाह चिडोझी एथलबर्ट उर्फ जॉन इझुग्वा फान्सिस(४५) रा. मस्जिद बंदर रोड, मुंबई आणि मुळचा रा. नायजेरीया देशाचा नागरिक आहे. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना ६६ लाख १८ हजार रुपये किंमतीचा ६६१.८ ग्रॅम वजनाचा एमडी पावडर हस्तगत करण्यात आली. त्याच्या विरोधात डायघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याला ठाणे न्यायालयात नेले असता न्यायालयाने १७ जानेवारी(शुक्रवार) पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक नायजेरियन तस्करावर मुंबई, ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत. मुंबई बान्द्रा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपी जॉन जेम्स फान्सिसयाला न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली आहे. तर सहा वर्षाचा तुरुंगवास भोगून सुटल्यानंतर ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केलेली असलायची माहिती ठाणे पोलीस गुन्हे शाखाचे अमरसिंह जाधव दिली.