Pravin Darekar : नाना पटोलेंसह 'त्या' दोन नेत्यांविरोधात प्रवीण दरेकर अब्रुनुकसानीचा दावा करणार

Continues below advertisement

Pravin Darekar on Mumbai Bank Scam : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मुंबई बँक (Mumbai Bank) बोगस मजूर प्रकरणात दुसऱ्यांदा चौकशी होणार आहे. यासंदर्भात प्रवीण दरेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'कितीही वेळा बोलावलं तरी चौकशीला यायला आपण तयार असून केवळ छळायच्या उद्देशाने चौकशीसाठी बोलावलं आहे.' यापूर्वी 4 एप्रिल रोजी दरेकर यांची याच प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यांची दुसऱ्यांदा चौकशी होणार आहे.

दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आपण अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचंही प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे. दरेकरांनी यावेळी सांगितलं की, ''विरोधकांनी एकत्रितपणे हातमिळवणी करून केलेलं हे षड्यंत्र आहे. मी नाना पटोले, भाई जगताप आणि धनंजय शिंदे यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. या संदंर्तातील पत्र त्या तिघांनाही पाठवणार आहे. कारण मुंबई बँकेचा नफा 15 कोटी असून आणि दोन हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात येत आहे. आपल्या प्रसिद्धीसाठी एखाद्याची बदनामी करणं योग्य नाही.''

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram