Pravin Darekar on NCP: राष्ट्रवादी रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष, प्रवीण दरेकर यांची जीभ घसरली

Continues below advertisement

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टिका करतना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची जीभ घसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलताना प्रवीण दरेकरांनी आक्षेपार्ह्य वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष असल्याचं वक्तव्य विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केलं आहे. महिलांचा अपमान करणाऱ्यांना योग्य शासन द्या, असा पलटवार राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. 

आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात रामोशी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रवीण दरेकरांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना प्रवीण दरेकरांनी सुरेखा पुणेकरांचं नाव न घेता टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे, असा टोला प्रवीण दरेकरांनी यावेळी लगावला. "या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे.", अशी टीकाही यावेळी दरेकरांनी केली होती.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रवीण दरेकरांना खडे बोल सुनावले आहेत. "आपल्या बोलण्यातून वैचारिक दारिद्र्य दिसून येतंय. संपूर्ण महाराष्ट्र हे पाहत आहे. आपल्या पक्षातील काही महिला बाहेर फिरताना आपण महिलांच्या कैवारी आहोत, असं दाखवण्याचा प्रयत्न करतायंत, आज मला त्यांची कीव येतेय. त्या अशा पक्षात काम करतायत, ज्यांच्या पक्षाचा हा विचार आहे. तुमच्या बोलण्यामुळं तुमच्या पक्षाची काय संस्कृती आहे ती दिसून आली. प्रवीण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य केलं त्याबद्दल तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महिलांचा अपमान करणाऱ्यांचं गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकतं, याची जाणीव ठेवावी."

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलताना प्रवीण दरेकर यांनी टीका केली. पण त्या टीकेची पातळी खालच्या दर्जाची होती. त्यांनी आक्षेपार्ह्य भाषा वापरलेली. त्यामुळे ज्यांच्या वक्तव्यामुळे महिलांचा अपमान झालाय, त्यांना चांगलीच शिक्षा देऊ, असा पलटवार राष्ट्रवादीनं केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram